पप्पांच्या जीवनातील हिरे
माझे पप्पा अनाथ वयाच्या 16 ते 19 व्या वर्षी वाई मिशन हाॅस्पीटल येथे सेवेसाठी रुजू झाले
डोंगरे,बक्ष,केदारी,भांबळ ही आजही त्यांच्या मुखातून उल्लेख होणारी नावे.
मिशन मधीलच काय पण मंडळीतील प्रत्येकाने माझ्या पप्पांना कसा आधार दिला याचा लेखाजोखा आजही पप्पा न चुकता सांगतात 1990 ला वाई सोडली व दौंड ला स्थाईक झालो तद्नंतर बारामती व सद्य भुसावळ येथे आहोत पण वाईतील ओढा कायमच अग्रस्थानी रहीला
आई गेल्यानंतर मदन मामा व कांचन मामी यांनी पप्पांना वाईला आणले व त्यांची खुप चांगली काळजी घेतली.एका अनाथाला पोरकेपणा कधीच जाणवू दिला नाही.
आई गेल्याचे दुःख सावरण्यासाठी वाईलाच यावे लागले. वाईतील अनेक कुटूंबांनी पप्पांना आधार दिला मदन मामा व कांचन मामी यांनीतर खुप केले
पण त्यात अजुन एक नाव होते ते म्हणजे
आपले लाडके भांबळ मामा यांचे
मित्र पप्पांचे पण माझ्यासाठी आजही भांबळमामा. वाईत आलो की भजन झाल्याशिवाय त्यांना रहावयाचे नाही
"येरुशलेमा येरुशलेमा" हे त्यांचे भजन अजूनही कानात घुमत रहाते.स्वतः तबला वाजवून भजन गाण्याची हुन्नरी त्यांच्याकडेच होती. पप्पांच्या एकटेपणांत एक खरा मित्र,भाऊ म्हणून भांबळ मामा उभे रहीले
प्रत्येकासंगती मनमिळावू स्वभाव असणारे व भजनातला तबलजी आज पदद्याआड गेला
मन दाटून आले.
पप्पांना अता कसे सांगु हा प्रश्न पडलाय?
आम्ही सर्व नाशिककर कुटूंबिय त्यांच्या दुखाःत सहभागी आहोत
प्रभुची शांती व सांत्वन आपणासंगती राहो ही प्रभुकडे प्रार्थना.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
No comments:
Post a Comment